पोलीस पाटील यांच्यात एक सुत्रता येण्यासाठी गणवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीस पाटील यांच्यात एक सुत्रता येण्यासाठी गणवेश
पोलीस पाटील यांच्यात एक सुत्रता येण्यासाठी गणवेश

पोलीस पाटील यांच्यात एक सुत्रता येण्यासाठी गणवेश

sakal_logo
By

पालघर, ता. २३ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील सर्व पोलिस पाटील यांच्यात एकसूत्रता येण्यासाठी व कोणत्याही प्रशासकीय अधिकारी गावामध्ये गेला असता पोलिस पाटील यांचे जनमानसात वेगळेपण दिसून यावे व सहज ओळखता यावे, अधिकार आणि कर्तव्य व सामाजिक जाणीव व्हावी, यासाठी पोलिस पाटील यांना निळ्या रंगाचा जॅकेट प्रदान करण्यात आला असून हा एक गणवेश आहे. हा गणवेश महाराष्ट्रात प्रथमच पालघर पोलिसांकडून पालघर जिल्ह्यात उपक्रम म्हणून राबविण्यात आला आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पालघर येथे केले.

पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या जनसंवाद अभियान, गाव आणि प्रशासन, यात महत्त्वाचा दुवा असलेला पोलिस पाटील याचे अधिकार व कर्तव्य याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात पालघर पोलिस दलातर्फे एक दिवसीय पोलिस पाटील यांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी पोलिस अधीक्षक पाटील बोलत होते. पोलिस पाटील प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील एकूण २४४ पोलिस पाटील हजर होते. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अकॅडमी नाशिक येथील विधीनिदेशक संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले, तसेच अप्पर जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर किरण महाजन, अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी नीता पाडवी, पोलिस उपअधीक्षक शैलेश काळे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98153 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..