लोकमान्यनगर भागात रस्ता खचला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकमान्यनगर भागात रस्ता खचला
लोकमान्यनगर भागात रस्ता खचला

लोकमान्यनगर भागात रस्ता खचला

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २३ : ऐन सकाळी कामाला जाण्याच्या वेळेस लोकमान्यनगर भागातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा रस्ता शुक्रवारी खचल्याची घटना घडली. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. त्यामुळे या भागातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. हा रस्ता खचल्याची ही चौथी वेळ आहे. डवलेनगर ते यशोधननगर या मार्गावरून टीएमटी बसगाड्यांसह इतर वाहनांचीही सतत वाहतूक सुरू असते. हा रस्ता शुक्रवारी सकाळी खचला आणि त्या ठिकाणी खोल खड्डा पडला. वाहन खड्ड्यांत पडून कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून स्थानिकांनी या मार्गावरील वाहतूक एका मार्गाने सुरू ठेवली; परंतु ऐन सकाळच्या सुमारास या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. या घटनेची माहिती मिळताच पालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन या ठिकाणी मार्गरोधक उभारून रस्त्याचे काम सुरू केले. काही महिन्यांपूर्वीही या मार्गावरील रस्ता खचला होता, त्यावेळी या रस्त्याची पाहणी करून हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी पालिका प्रशासनाकडून या रस्त्याखालील मातीचे परिक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यानंतर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98157 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..