कुत्र्याचा प्राण घेणाऱ्या तरुणाचा पोलिसांकडून शोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुत्र्याचा प्राण घेणाऱ्या तरुणाचा पोलिसांकडून शोध
कुत्र्याचा प्राण घेणाऱ्या तरुणाचा पोलिसांकडून शोध

कुत्र्याचा प्राण घेणाऱ्या तरुणाचा पोलिसांकडून शोध

sakal_logo
By

श्वानाला ठार मारणाऱ्या तरुणाचा पोलिसांकडून शोध
घाटकोपर, ता. २३ (बातमीदार) ः टेम्पोखाली बसलेल्या एका श्वानाला दांड्याने मारहाण करत त्याचे प्राण घेणाऱ्या तरुणाचा घाटकोपर पोलिस शोध घेत आहेत. झाल्या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावरून एका प्राणीमित्र संघटनेने पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तरुणाचा शोध सुरू केला आहे.
गुरुवारी घाटकोपर येथील अशोक नगरमध्ये एका टेम्पोखाली बसून भुंकणाऱ्या भटक्या श्वानाला तरुणाने दांड्याने मारहाण केली होती. त्यानंतर काही तासांत त्या श्वानाचा मृत्यू झाला. मारहाणीचा चीड आणणारा व्हिडीओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तरुणाने टेम्पोवर चढून श्वानावर दोन ते तीन वेळा दांड्याचा प्रहार केल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर काही तासांनी श्वान मरण पावला. व्हिडीओ पाहून ओम फाऊंडेशन प्राणिमित्र संघटनेने त्याबाबत घाटकोपर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृत श्वानाला ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी प्राणी रुग्णालयात पाठवले आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98158 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..