मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी
मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी

मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २३ : मुंबईत फोनवरून धमकी देण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी (ता. २१) सांताक्रूझ येथे राहणाऱ्या रफत हुसेन नामक व्यक्तीला अशाच प्रकारे धमकी देण्यात आली. अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल करून भारतात बॉम्बस्फोट घडवून विनाश करायचा असल्याचे सांगितले आहे.
या फोन कॉलनंतर तक्रारदाराने सांताक्रूझ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या माहितीच्या आधारे तक्रारदाराची तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसेच व्हिडीओ कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. फोन करणाऱ्याचे लोकेशन ट्रेस करण्यात आले असून लवकरच त्याला अटक करू, असे पोलिसांनी सांगितले. ज्या व्यक्तीला फोन आला होता, तो एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे.

झवेरी बाजारमध्येही बॉम्बस्फोट करण्याची धमकी
याआधी १९ सप्टेंबर रोजी मुंबई पोलिसांनी झवेरी बाजारमध्ये बॉम्बची खोटी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली होती. झवेरी बाजार परिसरात राहणाऱ्या दिनेश सुतार नावाच्या व्यक्तीने परिसरातील एका इमारतीत बॉम्ब असल्याची अफवा पसरवली होती. आरोपींनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला होता, त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98160 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..