छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढा आणि निवडणूकिला सामोरे जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढा आणि निवडणूकिला सामोरे जा
छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढा आणि निवडणूकिला सामोरे जा

छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढा आणि निवडणूकिला सामोरे जा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ ः तुम्ही जर आमच्या बापापर्यंत जात असाल, तर आमचे म्हणणे आहे की, आमच्या हिंदुस्थानचा जो बाप आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तुम्ही काढा. मग जनताजनार्दन योग्य निर्णय घेईल. निवडणुका आल्या की त्यांचे नाव वापरायचे, त्यांचे फोटो वापरायचे आणि निवडणूक संपली की महाराजांना विसरून जायचे, असे प्रत्युत्तर बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादासाहेब भुसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर बाप चोरणारी टोळी, असा आरोप केला आहे. त्याला मंत्री भुसे यांनी आपल्या भाषणातून उत्तर दिले.
शिंदे गटाच्या वतीने कल्याण ग्रामीण परिसरात शुक्रवारी शिवसेनेची संपर्क यात्रा हिंदू गर्वगर्जनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, बालाजी किणीकर, राजेश मोरे, दीपेश म्हात्रे, सुनील चौधरी, महेश गायकवाड यांसह अनेक पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना मंत्री दादासाहेब भुसे यांनी ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदे व शिंदे गट समर्थकांवर सातत्याने गद्दार, खोके घेतले, अशी टीका केली जात आहे. तसेच बाप चोरणारी टोळी, असा उल्लेख शिंदे गटाचा केला आहे. त्यावर भाषणात भुसे म्हणाले, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कोणा एका कुटुंबाचे बाप नव्हते, तर ते समस्त शिवसैनिकांचे बाप होते. ग्रामपंचायत निवडणुका होतात, त्या ठिकाणी शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराजांचे, शिवसेनाप्रमुखांचे नाव घेऊन सामोरे जात असतो. मग तुम्ही आमचा बाप काढून जे असे बोलतात, त्यांचे विचार फार संकुचित आहेत, असे मला वाटते. सतत गद्दार असे बोलले जाते; मात्र ५५ आमदारांपैकी ४० आमदार जेव्हा एखादी भूमिका घेतात, तेव्हा त्या पाठीमागे काही तरी असेल ना, अशी भावना पोटतिडकीने त्यांनी मांडली.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले; तर यापूर्वी एनडीआरएफच्या निरीक्षणाप्रमाणे मदत दिली जायची. मुख्यमंत्री शिंदे व भाजप सरकारने एनडीआरएफपेक्षा दुप्पट दराने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ६ हजार ८०० प्रतिहेक्टर मदत मिळायची ती आता १३ हजार ५०० रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. पूर्वी २ हेक्टरपर्यंत ही मदत मर्यादित होती ती आता ३ हेक्टरपर्यंत दिली जाणार आहे. ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला, तर मदत दिली जायची, आता सलग दोन तीन दिवस पाऊस पडला, तर ही मदत दिली जाणार आहे, असे ते म्हणाले.

मेळावा होईल तो भव्य-दिव्य
--------------------------
आजचा मेळावा फक्त ट्रेलर आहे. यामुळे दसरा मेळाव्याला आता कोणते मैदान शोधायचा, याचा विचार करायला लागेल, असे दादासाहेब भुसे म्हणाले. न्यायालयाचा निर्णय आपण स्वीकारत असतो. माझे व्यक्तिगत मत आहे की, आपण सांगताय त्याप्रमाणे निर्णय झालेला असेल, तर छत्रपती शिवाजी पार्क हे जे मैदान आहे, त्याच्यापेक्षा बीकेसी हे मोठे मैदान आहे आणि आता आपला शिवसेनेचा मेळावा कदाचित या मैदानावर अपुरा पडला असता. शिवसैनिक आपल्या आपल्या पद्धतीने काम करत असतात. आता शिंदेसाहेब जो काही निर्णय घेतील, ज्या मैदानावर मेळावा होईल तो भव्य-दिव्य होईल, असे मंत्री भुसे या वेळी म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98162 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..