कथोरे मित्र मंडळातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कथोरे मित्र मंडळातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
कथोरे मित्र मंडळातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

कथोरे मित्र मंडळातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

sakal_logo
By

किन्हवली, ता. २५ (बातमीदार) : आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहापूर तालुक्यातील किसन कथोरे मित्र मंडळाने किन्हवली परिसरातील विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
आमदार किसन कथोरे यांचे किन्हवली येथील समर्थक राजेश घागस व वेहळोली येथील राजेश निमसे यांनी पुढाकार घेत शिवाजीनगर शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. वेहळोली ग्रामस्थांच्या वतीने कथोरे यांचा वाढदिवस अभीष्टचिंतन व सत्कार सोहळा आयोजित केला होता. येथील बंधाऱ्याचा समावेश पर्यटन क्षेत्रात करून सुशोभीकरणासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे व गावातील अंतर्गत रस्ता, पूल मंजुरीबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. अस्नोली येथील प्रगती माध्यमिक विद्यालयातील ई लर्निंग सॉफ्टवेअरचे उद्‍घाटनही कथोरे यांनी केले. या वेळी भाजप ओबीसी मोर्चा ठाणे ग्रामीण अध्यक्ष रवींद्र चंदे, किन्हवली पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक कमलेश बच्छाव, सुरेश विशे आदी उपस्थित होते. या वेळी मोठ्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांनी विविध समस्यांबाबत आमदार किसन कथोरे यांना निवेदने दिली.