वाहतूक नियमांचे उल्लंघन भोवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक नियमांचे उल्लंघन भोवले
वाहतूक नियमांचे उल्लंघन भोवले

वाहतूक नियमांचे उल्लंघन भोवले

sakal_logo
By

नवी मुंबई, ता.२५ (वार्ताहर) : डिझेल संपल्यामुळे सीबीडी येथील उड्डाण पुलावर बंद पडलेल्या डंपरमुळे सायन-पनवेल मार्गावर शनिवारी सकाळी वाहतूक कोंडी झाली होती. या प्रकारामुळे वाहनचालकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागल्याने या प्रकाराची गंभीर दखल घेत सीबीडी वाहतूक पोलिसांनी डंपरचालकासह मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबई विमानतळ परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात विविध कामे सुरू आहेत. या परिसरात दगडाची वाहतूक करणारा एक डंपर शनिवारी सकाळी सायन-पनवेल महामार्गावरील उड्डाण पुलावर बंद पडला होता. या डंपरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त दगड भरण्यात आले होते. तसेच पुरेसे डिझेल असल्याची खात्रीदेखील करण्यात आली नसल्याने या प्रकारामुळे पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने महामार्गावर लागलेल्या रांगामुळे वाहतूक पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागली होती. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेत डंपरचालकाच्या निष्काळजीपणाविरोधात वाहतूक पोलिसांनी डंपरचालक अनिल मसुलकर याच्याविरोधात सीबीडी पोलिस ठाण्यात भादवि कलम २८३ सह मोटार वाहन कायदा कलम १२२/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच क्षमतेपेक्षा ६ टन जास्त माल भरल्याचे आढळून आल्याने डंपरच्या मालकालादेखील नवी मुंबई आरटीओने ३० हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
-----------------------------
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेजबाबदारपणे वाहन चालविणाऱ्या चालकांवर वाहतूक विभागाकडून यापुढील काळात देखील कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहतूक सुरळीत ठेवण्यास नवी मुंबई वाहतूक विभागास सहकार्य करावे.
- पुरुषोत्तम कराड, उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण विभाग