पोषण माह अभियान अंतर्गत सुदृढ बालकांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोषण माह अभियान अंतर्गत सुदृढ बालकांचा सत्कार
पोषण माह अभियान अंतर्गत सुदृढ बालकांचा सत्कार

पोषण माह अभियान अंतर्गत सुदृढ बालकांचा सत्कार

sakal_logo
By

पालघर, ता. २५ (बातमीदार) ः पालघर जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग जिल्ह्यात पोषण महाअभियान राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण १३ प्रकल्पांतर्गत ३१८२ अंगणवाडी केंद्र स्तरावर जनजागृती कार्यक्रम सुरू आहे. सदर अभियानात अंगणवाडी स्तरावर विविध उपक्रमाद्वारे जनजागृती मोहीम सुरू आहे.
पंचायत समिती पालघर येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत १३ विभागातील ३५४ अंगणवाडी केंद्रात स्वस्थ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये बिट स्तरावरील प्रत्येक अंगणवाडीत केंद्रात ६ महिने ते ३ वर्ष व ३ ते ५ वर्षे वयोगटातील २ बालकांची स्वस्थ बालक व त्यांच्या पालकांची काळजीवाहू पालक म्हणून निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या बालकांचा व पालकांचा अंगणवाडी स्तरावर लोकसहभागातून कौतुक सोहळा करण्यात आला. तसेच बिट स्तरावर निवड करण्यात आलेल्या २८ बालकांचा व पालकांचाही सन्मान करण्यात आला. या २८ बालकांधून प्रकल्पस्तरावर ३ बालकांची स्वस्थ बालक म्हणून निवड करण्यात आली. तसेच नॉर्मलमध्ये गेलेल्या एका बालकाला व त्याच्या पालकांना विशेष पुरस्कार देण्यात आला.

या वेळी महिला व बालकल्याण जिल्हा अधिकारी प्रवीण भावसार, पालघर गट विकास अधिकारी नरेंद्र रेंवडकर तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कल्पना पिंपळे, प्रकल्पातील मुख्य सेविका प्रतीक्षा म्हात्रे, वैशाली धांगडा, सुरेखा सुरवसे, मनीषा हातकर, अंगणवाडी सेविका प्राजक्ता म्हात्रे, कल्पना आघाव इत्यादींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, पालक, बालके यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. हा कार्यक्रम केळवे लायन्स क्लबचे हर्षल राऊत तसेच व डॉ. राजेश व श्वेता रॉय केळवे यांच्या सहकार्याने लोकसहभागातून करण्यात आला. या वेळी उपस्थित सर्व काळजीवाहक पालकांनी पौष्टिक पदार्थ तयार करून आणले होते.

कोट
बालकांना स्वच्छता किटचे वितरण
बालकांना मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते स्वच्छता किटचे वितरण करण्यात आले. यामध्ये साबण, नेलकटर, नॅपकीन, हॅन्डवॉश, तेल, पावडर, कंगवा इत्यादी वस्तू देण्यात आल्या; तर काळजीवाहक पालकांना फ्रुट बास्केट, केळी, शेवग्याची भाजी आदी प्रोत्साहनपर बक्षीस व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.