Sun, Feb 5, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घाटकोपरमध्ये गरबा रास
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घाटकोपरमध्ये गरबा रास
Published on : 25 September 2022, 8:25 am
घाटकोपर, ता. २५ (बातमीदार) ः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने घाटकोपर पश्चिम येथील जय महाराष्ट्र गणेश मैदानावर गरबा रास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेला हा गरबा सर्वांसाठी खुला आहे. येत्या (सोमवार) २६ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या काळात सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत हा उत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून देण्यात आली आहे. या ‘गरबा रास’ कार्यक्रमासाठी सर्व भाविकांनी, युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अॅड. अमोल मातेले यांनी केले आहे.