सेंट्रल पार्कच्या प्रवेशद्वारावर कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेंट्रल पार्कच्या प्रवेशद्वारावर कोंडी
सेंट्रल पार्कच्या प्रवेशद्वारावर कोंडी

सेंट्रल पार्कच्या प्रवेशद्वारावर कोंडी

sakal_logo
By

घणसोली, ता. २५ (बातमीदार)ः घणसोली विभागातील सेक्टर ४ येथील भूखंडावरील भाजी मार्केट उठवल्याने सेंट्रल पार्कच्या प्रवेशद्वारावर भाजी विक्रेत्यांनी व्यवसाय मांडला आहे. यामुळे सेंट्रल पार्कच्या दिशेने जाणाऱ्या आणि परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
घणसोली सेक्टर ४ येथील मोकळ्या भूखंडासाठी निविदा काढणार असल्याने सिडकोने आठवड्यापूर्वी याठिकाणी अनेक वर्षांपासून असणारे भाजी मार्केट उठवले आहे. त्यामुळे २०- ३० भाजी विक्रेत्यांनी व्यवसायासाठी जागा नसल्याने शेजारीच असलेल्या सेंट्रल पार्कच्या प्रवेशद्वारावर व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, परिसरात अनेक इमारती असून घणसोलीत राहणारे रहिवासी याच प्रवेशद्वारातून सेंट्रल पार्कच्या दिशेने जात असल्याने भाजी विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे आता अडथळ्याचा ठरत आहे. सायंकाळी ४ ते ९ या काळात मोठ्या संख्येने याठिकाणी ग्राहकांची वर्दळ असल्यामुळे नागरिकांना कोंडीतून मार्ग काढण्याची वेळ येत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या या भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विक्रेत्यांसोबत परिसरातील नागरिकांनी केली आहे.
-----------------------------------
गेल्या काही वर्षांपासून आम्ही या भूखंडावर व्यवसाय करत असून सिडकोने आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी.
- सखाराम ताम्हणे, भाजीविक्रेते
---------------------------------
घणसोली सेक्टर ४ येथील सेंट्रल पार्कच्या दिशेने जाणाऱ्या प्रवेशद्वारावर भाजी विक्रेते व्यवसाय करत आहेत. संध्याकाळनंतर या परिसरात चालणेही कठीण होत आहे.
- समीक्षा कदम, नागरिक