Sun, Jan 29, 2023

डहाणुत नवरात्रोत्सवाची लगबग
डहाणुत नवरात्रोत्सवाची लगबग
Published on : 25 September 2022, 9:32 am
कासा, ता. २५ (बातमीदार) : नवरात्रोत्सवाची तयारी सर्वत्र सुरू झाली असून सोमवारपासून या उत्सवास प्रारंभ होत आहे. यानिमित्त महालक्ष्मी, संतोषी माता सप्तशृंगी मंदिर येथे पुजारी गाभाऱ्यात पूजनाच्या कार्यक्रमाची तयारीत मग्न आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपूर्वी हे उत्सव साधेपणाने साजरे केले गेले. पण यावर्षी कोणतेही बंधन नसल्याने भाविकांचा उत्साह मोठा आहे.