
विक्रमगडवासीय नवरात्रोत्सवासाठी सज्ज
विक्रमगड, ता. २५ (बातमीदार) : नवरात्रोत्सवासाठी अंबेमाता, नवदुर्गा, चंडीका आदी रुपांमध्ये असलेली देवीची मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांनी देवीच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवला आहे.
विक्रमगड तालुक्यात गावपाड्यांमध्ये मंडाळांमार्फत सार्वजनिक अशी एकच देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाते. या काळात पारंपरिक नृत्य केले जातात. आज प्रत्येक क्षेत्रात महागाई वाढली असल्याने मूर्तीसाठी लागणाऱ्या मातीपासून इतर सर्व साहित्यही महागले आहे. नवरात्रोत्सव सोमवारपासून सुरू होणार आहे. मातेच्या अनेक मूर्ती घडविण्याचे काम पुर्ण झाले आहे. काही मंडळाच्या मूर्ती मंडपांमध्ये दाखलही झाल्या आहेत. दुसरीकडे घरोघरी पूजेसाठी लागणारे घट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. तालुक्यात गावागावात दांडिया, रास-गरबाचा सराव सुरू आहे. सार्वजविक मंडळाच्या रास- गरबा खेळाकरीता रोषणाईचे काम अंमित टप्प्यात आले आहे.