मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत ‘मन की बात’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत ‘मन की बात’
मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत ‘मन की बात’

मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत ‘मन की बात’

sakal_logo
By

भिवंडी, ता. २५ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे दोन हजार नागरिकांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम पाहिला. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार, ‘व्होकल फॉर लोकल’ निमित्ताने आगामी नवरात्र व दिवाळीच्या काळात खादी, हॅण्डलूम आणि हॅण्डीक्राफ्टचे साहित्य खरेदी करून स्थानिक कारागिरांना सहाय्य करण्याचा संकल्प केला. काल्हेर येथील जय गुरुदेव कॉम्प्लेक्समध्ये ९३ व्या मन की बात कार्यक्रमाचे जाहीर प्रक्षेपण करण्यात आले. त्या वेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात स्थानिक कलाकारांना पाठिंबा देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. स्थानिक कलाकारांना बाजारपेठ निर्माण व्हावी, यासाठी आगामी सणांच्या काळात आवर्जून खादी, हॅण्डलूम आणि हॅण्डीक्राफ्टचे साहित्य खरेदी करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानुसार काल्हेरमध्येही स्थानिक कारागिरांना साहित्य खरेदीचा संकल्प करण्यात आला. त्याचबरोबर स्वच्छता व पर्यावरण राखण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही देण्यात आली.