Mumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटक
बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटक

Mumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटक

sakal_logo
By

वडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.

त्याने व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल करून बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. गुन्हे शाखेने तपास केल्याप्रमाणे सहानीने हैद्राबादमधून कॉल केल्याचे सांगण्यात येत आहे. कॉल केल्यानंतर तो ट्रेनमध्ये चढला आणि मुंबईच्या दिशेने निघाला. सहानी मुंबईत पोहोचताच त्याचा शोध घेण्याचे काम गुन्हे शाखेने सुरू केले. अखेर मोबाईल लोकेशनच्या मदतीने सहानीला दक्षिण मुंबईतील चर्नी रोड परिसरातून शनिवारी अटक करण्यात आली.

सहानीने सांताक्रूझ येथे राहणाऱ्या रफत हुसेन नावाच्या व्यक्तीला व्हिडीओ कॉल केला आणि त्याला ‘बॉम्बस्फोट करना हैं इंडिया में विनाश होना हैं’ असे सांगितले. या फोन कॉलनंतर तक्रारदार, जो राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे, त्याने मुंबई पोलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तक्रार घेऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.