
पुरावा लपवण्यासाठी मृतदेह घेऊन जाणाऱ्या आरोपीस अटक
भिवंडी, ता. २५ (बातमीदार) : शहरातील शास्त्रीनगर येथे गुलशन अपार्टमेंटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पतीने पत्नीला जीवे ठार मारल्याची घटना उघडकीस आली. पत्नीचे शव, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने घेऊन जात असताना पुणे येथे सापडल्याने त्यास पोलिसांनी अटक केली.
शहरात शास्त्रीनगर पाचू कंपाऊंडमधील गुलशन अपार्टमेंटमध्ये फ्लॅट नंबर ६०१ येथे सद्दाम शरीफ सय्यद आणि कविता रामप्पा मादर हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांचे आपसात भांडण झाल्यामुळे सद्दामने कविताचा गळा दाबून तिला जीवे ठार मारले. ही घटना पहाटेच्या वेळी घडल्यानंतर त्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पत्नीचा मृतदेह विजापूरला नेण्याचे ठरवले. ही घटना पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी सापळा लावून सद्दाम याला पुणे येथे रंगेहाथ पकडून अटक केली. त्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.