शीतल म्हात्रे यांच्या विरोधात कारवाई करा; राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शीतल म्हात्रे यांच्या विरोधात कारवाई करा; राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक
शीतल म्हात्रे यांच्या विरोधात कारवाई करा; राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

शीतल म्हात्रे यांच्या विरोधात कारवाई करा; राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

sakal_logo
By

बदलापूर, ता. २५ (बातमीदार) ः खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा खोटा मॉर्फ केलेला फोटो शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी पोस्ट करून सुप्रिया सुळे यांची बदनामी केली असल्याचा आरोप बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी केला आहे. याविरोधात ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या व बदलापूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले.
दोन वेगवेगळे फोटो जोडून चुकीच्या पद्धतीने पोस्ट करून संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिमा मलीन करण्याचा स्पष्ट हेतू या फोटोतून दिसत आहे. पोलिसांनी त्वरित यावर कारवाई करावी. तसेच शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांची जाहीर माफी मागून पोस्ट डिलिट करावी, अशी मागणी या महिला कार्यकर्त्यांनी बदलापूरच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी प्रियांका दामले, महिलाध्यक्ष अनिता पाटील, अनिसा खान, सोनल मराडे, हर्षाली गायकवाड, शिल्पा खंडागळे, मानसी गांगुर्डे आदी महिला उपस्थित होत्या.