नियंत्रण सुटलेल्याने डंपरवरची वाहनांना धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नियंत्रण सुटलेल्याने डंपरवरची वाहनांना धडक
नियंत्रण सुटलेल्याने डंपरवरची वाहनांना धडक

नियंत्रण सुटलेल्याने डंपरवरची वाहनांना धडक

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : मुंबईहून डेब्रिज घेऊन नवी मुंबईत येणाऱ्या डम्परवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने डम्परने ९ वाहनांना धडक दिल्याची घटना रविवारी सायंकाळी वाशी खाडीपुलावर टोल नाक्याजवळ घडली. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यात तीन जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर डम्परचालक पळून गेला असून वाशी पोलिसांनी डम्परसह क्लीनरला ताब्यात घेतले आहे. या अपघातातील डम्परचे स्टेअरिंग फेल झाल्यामुळे सदर डम्परवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याचे बोलले जात आहे.

या अपघातातील डम्पर एमएच- ४६ एएफ-६६९४ रविवारी सांयकाळी मुंबईहुन डेब्रिज घेऊन नवी मुंबईत येत होता. हा डम्पर वाशी खाडीपुलावर टोलनाक्याच्या अलिकडे आल्यानंतर डम्परवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे डम्पर आपल्या पुढे असलेल्या सर्व वाहनांना धडक देत पुढे गेला. त्यानंतर डम्परने रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुचाकीला जोरात धडक देऊन एल ॲन्ड टी कंपनीच्या पत्र्यांना धडकून थांबला. त्यानंतर डम्परचालकाने पलायन केले. या अपघातात, दुचाकीवरील दोघे जण अडकून होते. त्या दोघांना वाहतूक पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. या दोघांच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. त्याचप्रमाणे अपघातग्रस्त कारमधील एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर डम्परचालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या अपघातामुळे वाशी खाडी पुलावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली होती. वाशी वाहतूक पोलिसांनी या अपघातातील सर्व अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत सुरू केली.