सारिका टायर कंपनीत स्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सारिका टायर कंपनीत स्फोट
सारिका टायर कंपनीत स्फोट

सारिका टायर कंपनीत स्फोट

sakal_logo
By

वाडा, ता. २५ (बातमीदार) ः तालुक्यातील उसर या गावाच्या हद्दीत असलेल्या सारिका इंटर नॅशनल रेटिंग प्रा.लि. या टायर कंपनीत शनिवारी रात्रीच्या सुमारास रिअॅक्टरचा स्फोट होऊन एक कामगार मृत्यू झाला असून दोन कामगार जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
राहुल पासवान (वय २०) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून सुनील पासवान (वय २०), समिंदर उमार सिंह (वय २८) हे दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अंबाडी येथील साईदत्त रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुक्यातील उसर या गावाच्या हद्दीत सारिका इंटर नॅशनल प्रा.लि.ही टायर कंपनी असून या कंपनीत गाड्यांच्या जुन्या टायरमधून फर्नांस ऑईलचे उत्पादन घेतले जाते. शनिवारी रात्रीच्या सुमारास कंपनीत काम सुरू असताना रिअॅक्टरचा स्फोट होऊन रिअॅक्टरमधील गॅस जोरात बाहेर पडल्याने मशीनमधील झाकणाचा जोराचा फटका राहुल याच्या डोक्याला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला; तर सुनील व सविंदर उमार हे दोन कामगार जखमी झाले. दरम्यान, कंपनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाला असल्याने कंपनीचे मुख्य व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम वाडा पोलिस ठाण्यात सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.