Mon, Feb 6, 2023

१५ वर्षीय मुलीची आत्महत्या
१५ वर्षीय मुलीची आत्महत्या
Published on : 25 September 2022, 2:36 am
मुंबई, ता. २५ : वरळी येथील सेंच्युरी बाजारजवळील म्हाडा इमारतीत वास्तव्यास असलेल्या १५ वर्षीय मुलीने शनिवारी आत्महत्या केली. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांचे पथक घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. ज्या इमारतीत तिचा मृतदेह सापडला त्याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मृत तरुणीही राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. ती दहावीची विद्यार्थिनी होती. इमारतीच्या छताला मुलीचा मृतदेह लटकलेला पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. पालक अभ्यास करण्यास सांगत होते, या कारणास्तव मुलीने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.