अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची निवड
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची निवड

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची निवड

sakal_logo
By

वाशी, ता. २५ (बातमीदार) ः माजी आमदार दिवंगत अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये आयोजित माथाडी कामगार मेळावा आणि गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची निवड करण्यात आल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर उपस्थित माथाडी वर्गाने घोषणाबाजी करून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले.
या महामंडळाच्या अध्यक्षपदी मविआ सरकारच्या पूर्वी सत्तेत असणाऱ्या शिवसेना-भाजप युतीने आमदार नरेंद्र पाटील यांची निवड केली होती. मात्र त्यानंतर मागील अडीच वर्षांत सरकारने महामंडळाच्या नियुक्त्या केल्या नव्हत्या. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर सत्तेवर विराजमान झालेल्या फडणवीस आणि शिंदे सरकारने महामंडळांच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची फेरनियुक्ती करून निवडणुकीच्या तोंडावर माथाडींना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न केला आहे.
माथाडी कामगारांचे अनेक रखडलेले प्रश्न पुढील काळात मार्गी लावण्यात येतील. दिवंगत अण्णासाहेब पाटील महामंडळ व सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजात नवीन उद्योजक तयार होण्यासाठी अनेक योजनांवर राज्य शासन काम करत आहे. महामंडळाची जबाबदारी पुन्हा एकदा माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर सोपविण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.