वाढवणविरोधात शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार: उद्धव ठाकरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाढवणविरोधात शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार: उद्धव ठाकरे
वाढवणविरोधात शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार - उद्धव ठाकरे

वाढवणविरोधात शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार: उद्धव ठाकरे

sakal_logo
By

डहाणू: वाढवण परिसरातील रहिवाशांनी नवीन पिढीचा विचार करून, बंदर हवे की नको, याचा ठाम निर्णय घ्यावा, या बंदरामुळे तेथील पर्यावरण, शेतकरी, बागायतदारांसह मच्छीमार उद्‍ध्वस्त होणार असतील तर त्यांच्या पाठीशी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उभी राहील, लढ्यात सहभागी होईल, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाढवण विरोधी समितीच्या शिष्टमंडळास दिले.

मुंबईतील ‘मातोश्री’ या निवासस्थानी महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छीमार संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाच्या शिष्टमंडळाने वाढवण बंदराची भूमिका स्पष्ट करण्यासाठी घेतलेल्या बैठकीत उद्धव यांनी सरकारला इशारा दिला. या बैठकीला नारायण पाटील, लिओ कोलासो, रामकृष्ण तांडेल, जयप्रकाश भाय, किरण कोळी, अशोक आंभिरे, कृष्णकांत पाटील आदी २५ प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी लिओ कोलासो आणि नारायण पाटील यांनी वाढवण बंदर विरोधी भूमिका मांडली;

तर कोकणातील नाणार प्रकल्पाबाबत तेथील जनतेत दुहेरी भावना असल्याचे आता निदर्शनास येत आहे, असे होऊ नये म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले. शिवाय येथील लोकांची वाढवण बंदर विरोधी भूमिका ठाम असेल तर तेथे होणाऱ्या बंदरविरोधी सभेला सर्व ताकतीनिशी उपस्थित राहून लढ्यात सहभागी होऊ, शिवाय १७ नोव्हेंबर रोजी वाढवण बंदर विरोधात मंत्रालयावर निघणाऱ्या महामोर्चात सहभागी होण्याचे आश्वासनही त्यांनी दिली.