जादूटोणाप्रकरणी सोनगान येथे कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जादूटोणाप्रकरणी सोनगान येथे कारवाई
जादूटोणाप्रकरणी सोनगान येथे कारवाई

जादूटोणाप्रकरणी सोनगान येथे कारवाई

sakal_logo
By

मुरबाड, ता. २७ (बातमीदार) ः मुरबाड तालुक्यातील सोनगाव येथे जादूटोणा करण्यासाठी एकत्र जमलेल्या नऊ जणांना टोकवडे पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये दोन तरुणींचा समावेश आहे. ताब्यात घेतलेल्या दोन जणांवर यापूर्वी नरबळीचा गुन्हा नोंद झाला असल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोनगाव येथील रशीद शेख यांच्या बंद घरामध्ये रविवारी (ता. २५) रात्री काही लोक दरवाजा बंद करून जादूटोणा करत असल्याची माहिती संजय भोईर यांनी टोकवडे पोलिसांना कळवली होती. त्यानुसार पोलिसांनी ग्रामस्थांसह घरामध्ये प्रवेश केला असता पूजेसाठी असणारे साहित्य लिंबू , मिरची, अगरबत्ती, नारळ वगैरे घरात दिसून आले. घटनास्थळी काजी दाऊद शेख, बंधू तुकाराम वाघ, विजय वाघ या तीन इसमांसह इतर चार पुरुष व पुणे जिल्ह्यातील बोरघर येथील सुनीता वाघ व साक्षी शेळके या दोन तरुणी होत्या.
याबद्दल पोलिसांनी त्यांची चौकशी केली. साक्षी या तरुणीवर कोणी तरी करणी केल्यामुळे ती उतरवण्यासाठी; तर सुनीता हिने भूत उतरवण्यासाठी आले असल्याचे सांगितले. त्यांच्या सोबत साईनाथ कदम, गणेश देशमुख, दत्तात्रय चौधरी, गणेश शेलार हे चार इसम आढळून आले. सदर ठिकाणी नाशिक येथून पुजेसाठी बाबा येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या सर्वांविरुद्ध भादंवि कलम ३४ अन्वये महाराष्ट्र नरबळी, अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध कायद्यानुसार टोकवडे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष दराडे करीत आहेत.


मुरबाड ः तालुक्यातील सोनगाव येथे जादूटोणा करण्यासाठी मांडलेले साहित्य.