धोकादायक वीज मीटर केबिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धोकादायक वीज मीटर केबिन
धोकादायक वीज मीटर केबिन

धोकादायक वीज मीटर केबिन

sakal_logo
By

धारावी, ता. २७ (बातमीदार) : धारावी क्रॉस रस्त्यावरील अण्णानगर येथील ‘बेस्ट’ च्या विजेचे मीटर केबिन धोकादायक अवस्थेत आहे. गेले अनेक दिवसांपासून हे विजेचे केबिन तुटलेले असल्याने रहिवाशांसाठी धोका निर्माण झाला आहे.
अण्णानगरच्या समोरच पालिकेची संत कक्कया शाळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा व कनिष्ठ महाविद्यालय शाळा आहेत. वर्दळीचा रस्ता असल्याने रस्त्यावर वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. येथील केबिनच्या वरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धारावी तालुका अध्यक्षांचे कार्यालय आहे. कार्यालयात सतत गर्दी असते; तर केबिनच्या आसपास खाद्यपदार्थ बनवण्याचे कारखाने व विक्री करणारी दुकाने आहेत. धोकादायक अवस्थेत असलेल्या वीज केबिनमध्ये काही गडबड होऊन एखादी दुर्घटना घडल्यास मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

वस्तीतील अनेक घरांना या केबिनमधून वीजपुरवठा केला जातो. माझ्या कार्यालयाखालीच ही धोकादायक अवस्थेतील वीज मीटरची केबिन आहे. संबंधितांनी याची दखल घेणे गरजेचे आहे.
- नंबी राजा, अध्यक्ष धारावी तालुका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.