विवार येथे साहित्य चावडी कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवार येथे साहित्य चावडी कार्यक्रम
विवार येथे साहित्य चावडी कार्यक्रम

विवार येथे साहित्य चावडी कार्यक्रम

sakal_logo
By

विरार, ता. २७ (बातमीदार) ः अक्षरातून, शब्दातून आणि लेखणीतून अमृता प्रीतम नेहमीच लढत राहिल्या. स्त्रीजीवनाच्या व्यथित कथा, समाजाच्या न पटणाऱ्या घटनांवर परखडपणे त्या भाष्य करत होत्या, असे प्रतिपादन श्रद्धा वझे यांनी अमृता प्रीतम यांच्यावरील व्याख्यानात व्यक्त केले. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व समन्वयक आजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या साहित्य चावडी या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. चावडीचे सरपंचपद दिग्दर्शक, नाट्यकर्मी अनिल कदम यांनी भुषविले.
अमृता प्रीतम यांच्या लेखणीत जिवंतपणा होता म्हणून त्यांचे स्त्रीवादी साहित्य, राजकारण, समाजकारण याच्याशी संबंधित होते. पाकिस्तानात लेखणीने लढणारी अमृता प्रीतम पंजाबी आणि हिंदी भाषेतील प्रसिद्ध कवयित्री म्हणून नावाजली. आतापर्यंत ३६ भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा अनुवाद केला आहे, असेही श्रद्धा वझे यांनी अमृता प्रीतम यांच्या बालपणापासूनच्या सर्व आठवणींना उजाळा देताना सांगितले. या वेळी त्यांनी गीतकार, साहित्य व चित्रकार इमरोज यांचाही उल्लेख केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेखा कुरकुरे यांनी केले; तर सूत्रसंचालन प्रा. विजय मूर्ती यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुकर तराफे, विक्रांत केसरकर, दीपाली जाधव यांनी मेहनत घेतली.