Sun, Feb 5, 2023

पेल्हार येथे अनधिकृत बांधकाम निष्कासित
पेल्हार येथे अनधिकृत बांधकाम निष्कासित
Published on : 27 September 2022, 11:59 am
वसई, ता. २७ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेने नालासोपारा पूर्वेकडील जाबरपाडा, पेल्हार येथील नऊ हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे अनधिकृत बांधकाम निष्कासित केले आहे. पेल्हार येथे पाच अनधिकृत गाळ्यांचे बांधकाम सुरू होते. याची माहिती महापालिकेचे अतिक्रमण विभाग उपायुक्त अजित मुठे यांना मिळताच त्यांनी यंत्रणेसह घटनास्थळी जाऊन कारवाईचा बडगा उगारला आहे.
------------------
वसई : अनधिकृत बांधकामावर पेल्हार येथे कारवाई करताना पालिकेची यंत्रणा.