Raids on PFI : मुंब्रा, कल्याणमधून ४ कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PFI
पीएफआयचे चार कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Raids on PFI : मुंब्रा, कल्याणमधून ४ कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

डोंबिवली, कळवा : देशभर पीएफआय कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असून मुंब्रा शिळ डायघर परिसरात पीएफआयच्या तीन कार्यकर्त्यांना ठाणे गुन्हे शाखेने सोमवारी रात्री उशिरा या भागात छापा घालून अटक केली. दाऊद सिराज, अहमद शेख व अब्दुल मतीन शेखान अशी त्यांची नावे आहेत; तर कल्याणमधील पीएफआयच्या एका कार्यकर्त्याला बाजारपेठ पोलिस आणि ठाणे खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी पहाटे कारवाई करत ताब्यात घेतले. फरदीन पैकर असे संशयिताचे नाव असून त्याची पोलिस चौकशी करत आहेत.

फरदीन पैकर कल्याण पश्चिमेतील रोहिदास वाडा परिसरात आझाद चाळीत पत्नी व आईसह राहतो. कारवाईबाबत फरदीनचा भाऊ फरहान याने सांगितले, अनेक वर्षांपासून फरदीन हा परिसरात सामाजिक कार्य करत आहे. त्याने कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही. सध्या तो सोशल डेमोक्रॅटिक फ्रंटसाठी काम करत होता. आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला योग्य न्याय मिळेल, असे त्याने सांगितले.

टॅग्स :Thanecrime