थापा पैशाने विकणारा माणूस नाही, तर तो निष्ठावंत माणूस - मुख्यमंत्री शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थापा पैशाने विकणारा माणूस नाही, तर तो निष्ठावंत माणूस - मुख्यमंत्री शिंदे
थापा पैशाने विकणारा माणूस नाही, तर तो निष्ठावंत माणूस - मुख्यमंत्री शिंदे

थापा पैशाने विकणारा माणूस नाही, तर तो निष्ठावंत माणूस - मुख्यमंत्री शिंदे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : बाळासाहेबांची सावली समजले जाणारे चंपासिंग थापा यांनी सोमवारी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर थापा यांच्यावर उद्धव ठाकरे गटाने मातोश्रीवरील कुत्रे फिरवणारा आणि लादी पुसणारा माणूस अशी टीका करत पैसे घेत त्यांनी प्रवेश केल्याचा आरोप केला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना, थापा हा पैशाने विकणारा माणूस नसून तो निष्ठावंत माणूस आहे. तसेच थापांवरील आरोप हा त्यांचा अपमान आहे. खऱ्या अर्थाने तो नेपाळी समाज आणि नेपाळी माणसाचा अपमान असे म्हणून त्याचा आपण जाहीर निषेध करतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
थापा यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर त्यांच्यावर उद्धव ठाकरे गटाने थेट मातोश्रीवरील कुत्रे फिरवणारा आणि लादी पुसणारा अशी टीका करण्यात आली. तसेच त्याने पैसे घेऊन प्रवेश केला असा आरोपही केला गेला. त्या आरोपाला मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी रात्री उत्तर देताना ते कोणाला नोकर समजले त्याच्यामुळे त्यांची ही परिस्थिती झाली आहे. तसेच थापा हे मध्यंतरी आपणास येऊन भेटले होते. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना नाराजीही व्यक्त केली होती; तर हा माणूस पैशाने विकणारा नसून तो निष्ठावंत माणूस आहे. तो बाळासाहेबांसोबत अनेक वर्षे होता. बाळासाहेब आणि थापा हे समीकरण अख्ख्या देशाने पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील आरोप हा खऱ्या अर्थाने नेपाळी माणूस आणि समाजाचा अपमान आहे. त्याचा आपण जाहीर निषेध करतो, असे शेवटी मुख्यमंत्री म्हणाले.

लवकरच २० हजारांची पोलिस भरती
...........

नुकताच कॅबिनेटमध्ये पोलिस भरतीबाबत निर्णय घेतला आहे. २० हजार जणांच्या भरतीत मोठ्या प्रमाणात महिला पोलिस दलात येतील आणि त्या राज्याची कायदा व सुव्यवस्था सांभाळतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.