Mumbai : कोकणच्या पर्यटनाला नवी मुंबईतून उर्जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Tourism Day
कोकणच्या पर्यटनाला नवी मुंबईतून उर्जा

Mumbai : कोकणच्या पर्यटनाला नवी मुंबईतून उर्जा

नवी मुंबई : पर्यटनदिनानिमित्ताने नेरुळ येथील डी.वाय. पाटील महाविद्यालयात युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीज आणि पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे कोकण विभागाचे उपायुक्त मकरंद देशमुख यांच्याहस्ते उद्घाटन झाले. यावेळी कोकणाच्या पर्यटनाला व्यावसायिक स्वरुप देण्याचा अनुषंगाने डी.वाय. पाटील महाविद्यालयासोबत सामंज्यस्य करार करण्यात आला आहे.

कोकणाच्या पर्यटनाला व्यावसायिक स्वरुप देण्याचा प्रयत्न सुरु आहे. याच अनुषंगाने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून कोकणातील पर्यटनासंबंधित पायभूत सुविधा उत्तम आणि दर्जेदार करण्याच्या हेतूने पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग आणि डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीज, नेरुळ यांच्यात तीन वर्षांसाठी सामजस्य करार करण्यात आला. या करारानुसार महाविद्यालयात आदरातिथ्य आणि पर्यटन विषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्यटन विभागामार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच विविध विषयांवर कार्यशाळांमुळे स्थानिक नागरिकांना प्रशिक्षित केले जाणार असून यामुळे कोकणातील पर्यटन विकासाच्या नवनवीन संकल्पना उदयास येणार आहेत.

यांच्या विशेष उपस्थिती

पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे, निसर्ग टुरिझमचे संचालक संजय नाईक, डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीजच्या संचालीका पल्लवी चौधरी, उपप्राचार्य आरती पंदिरकर, विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंपादक प्रविण डोंगरदिवे आणि पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय कोकण विभागाच्या लेखापाल रुपाली राणे यांच्यांसह विद्यार्थी उपस्थित होते.