मुंबई : घटस्फोट मागितला म्हणून पत्नीचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime
घटस्फोट मागितला म्हणून पत्नीचा खून

मुंबई : घटस्फोट मागितला म्हणून पत्नीचा खून

चेंबूर : टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पत्नीचा चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. आरोपीला टिळकनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

मोहम्मद इक्बाल शेख (वय ३२) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पी. एल. लोखंडे मार्गावरील नागेवाडी येथे राहत असलेला मोहम्मद याने तीन वर्षांपूर्वी रूपाली ऊर्फ जारा हिच्याशी विवाह केला होता. लग्नानंतर काही दिवसांनी आरोपी इक्बालचे कुटुंबीय एकत्र राहायला आले. त्यांनी रूपालीवर मुस्लिम रीतिरिवाज पाळण्यासाठी दबाव टाकला होता, पण रूपालीने त्यांचे ऐकले नाही. पुढे तिला एक मुलगा झाला. ती वेगळी राहू लागली. पती-पत्नीमध्ये फोनवर बोलणे व्हायचे. प्रथा पाळण्यावरून पुन्हा भांडण झाल्याने रूपालीने इक्बालला घटस्फोट देण्यास सांगितले. त्यावरून वाद वाढत गेला. या वादातून इक्बालने तिचा खून केला. त्याचा आधीही विवाह झालेला होता. रूपालीची बहीण करुणा अगस्तीन रॉयल हिने टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली असल्याची माहिती टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील काळे यांनी दिली.

टॅग्स :Mumbai NewsCrime News