श्वानदंशांच्या प्रमाणात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्वानदंशांच्या प्रमाणात घट
श्वानदंशांच्या प्रमाणात घट

श्वानदंशांच्या प्रमाणात घट

sakal_logo
By

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : गेल्या चार वर्षांत शहरात श्वानदंशांच्या घटनांमध्ये घट झाली आहे. २०१८ ते २०२२ दरम्यान रेबीज किंवा संबंधित मृत्यूची एकही नोंद पालिकेतर्फे करण्यात आली नसल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे रेबीज नियंत्रित करण्यात यश आले असे नाही. कारण पालिकेच्या नियमानुसार रेबीज प्रकरणाची नोंद जेव्हा व्हायरसचे निदान होईल तेव्हाच केली जाते; मात्र शरीरातील विषाणूचे निदान होण्यासाठी शवविच्छेदन हा सर्वोत्तम मार्ग आहे, परंतु रेबीजचा विषाणू इतका संसर्गजन्य आहे, की शवविच्छेदन केले जात नाही. दरम्यान, महाराष्ट्रात दरवर्षी हजारो रेबीजमुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.
मुंबईत २०१८ मध्ये ८५,४३८ कुत्र्यांनी चावल्याची नोंद झाली होती; मात्र तेव्हापासून ही संख्या कमी होत आहे. २०१९ मध्ये या घटनांमध्ये १४ टक्क्यांनी घट होऊन ७४,२७९ एवढी नोंद झाली आणि २०२० च्या पहिल्या कोविड वर्षात २०१८ च्या तुलनेत ३२ टक्के घट होऊन ५३,०१५ एवढ्या कुत्रा चावलेल्या प्रकरणांची नोंद पालिकेने केली.
२०२१ मध्ये कुत्रा चावलेल्यांची संख्या १० टक्क्यांनी वाढून ६१,३३२ वर पोहोचली आणि या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत पालिकेने कुत्र्याने चावण्याच्या घटनेत ५० हजार ६२२ प्रकरणांची नोंद केली आहे. विशेष म्हणजे या चार वर्षांत पालिकेने रेबीजचा एकही रुग्ण किंवा मृत्यूची नोंद केलेली नाही.
...
संसर्गजन्य स्वरूपामुळे...
आमच्याकडे दरवर्षी दोन ते तीन संशयित रेबीज प्रकरणे आढळतात, परंतु तो मृत्यू रेबीजनेच झाला हे कळण्यासाठी कोणताही मार्ग नाही. कारण त्यासाठी शवविच्छेदन आवश्यक आहे, जे रेबीज विषाणूच्या संसर्गजन्य स्वरूपामुळे फारसे सुचवले जात नाही, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या.
...
वर्ष श्वान चावे मुंबईत रेबिजचे प्रकरण
२०१८ ८५,४३८ ०
२०१९ ७४,२७९ ०
२०२० ५३,०१५ ०
२०२१ ६१,३३२ ०
२०२२ ५०,६२२ ०