प्रकृती अस्वास्थ्यामुळे दीपिका रुग्णालयात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकृती अस्वास्थ्यामुळे दीपिका रुग्णालयात
प्रकृती अस्वास्थ्यामुळे दीपिका रुग्णालयात

प्रकृती अस्वास्थ्यामुळे दीपिका रुग्णालयात

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला शारीरिक अस्वास्थ्यामुळे सोमवारी (ता. २६) रात्री मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दीपिकाच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. प्रकृतीबद्दल तिच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. तरी तिची तब्येत चांगली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काही महिन्यांपूर्वी दीपिकाला ‘प्रोजेक्ट के’चे चित्रीकरण करत असताना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळी तिने हृदयाचे ठोके वाढल्याची तक्रार केल्याने तिला तातडीने कामिनेनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याआधीही चाहत्यांनी दीपिकाच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, सध्या दीपिका शाहरूख खान आणि जॉन अब्राहमसोबत ‘पठाण’मध्ये तसेच ‘जवान’मध्ये, ‘प्रोजेक्ट के’मध्ये प्रभाससोबत आणि सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’मध्ये हृतिक रोशनसोबत दिसणार आहे.