Navi Mumbai: लैंगिक शोषण प्रकरणात युवकावर एक गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news
लैंगिक शोषण प्रकरणात आणखी एक गुन्हा

Navi Mumbai: लैंगिक शोषण प्रकरणात युवकावर एक गुन्हा

नवी मुंबई: सीवूड्स येथील आश्रमशाळा लैंगिक शोषण प्रकरणातील पीडित मुलींचा लैंगिक छळ झाला नसल्याचे सांगण्यासाठी जाहीर पत्रकार परिषद घेऊन आश्रमशाळा व आरोपी राजकुमार येसुदासन याचा बचाव करणारे समर्थकच गोत्यात आले आहेत. पोक्सोच्या गुह्यातील पीडित मुलीचे नाव उघड केल्याने एनआरआय पोलिसांनी पत्रकार परिषद घेणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता पाच जणांवर गुन्हा झाला आहे.

सीवूड्स येथील चर्चमध्ये सुरू असलेल्या आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलींचा तेथील पास्टरकडून लैंगिक शोषण होत असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभागाने येथील पास्टर विरोधात एनआरआय पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी पास्टर राजकुमार येसुदासन याच्याविरोधात विनयभंग व पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.

मात्र, त्यानंतर चर्च व आरोपी राजकुमार येसुदासन याच्या बचावासाठी पुढे आलेल्या एआरके फाऊंडेशन या संस्थेने आॅगस्ट महिन्यात जुईनगर येथे जाहीर पत्रकार परिषद घेऊन संस्थेमध्ये कोणत्याही मुलीवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे सांगत ठाणे जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाने पोलिसांकडे खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप केला होता. तसेच आरोपी राजकुमार येसुदासन याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता.