शहापूर येथे अभियांत्रिकी सप्ताहाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापूर येथे अभियांत्रिकी सप्ताहाचे आयोजन
शहापूर येथे अभियांत्रिकी सप्ताहाचे आयोजन

शहापूर येथे अभियांत्रिकी सप्ताहाचे आयोजन

sakal_logo
By

शहापूर, ता. २९ (बातमीदार) : तालुक्यातील आत्मा इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड टेक्नॉलॉजी येथे अभियांत्रिकी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पदवी व पदविका अभ्यासक्रमातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स या विषयाचे अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याविषयीचे प्रात्यक्षिक सादर केले. यात मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल क्विझ, वॉटर रॉकेट कॉम्पिटिशन, नट बॅलन्सिंग गेम, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ब्रिज बनवणे, बिल्डिंग बनवणे, तसेच संगणक विभागातील विद्यार्थ्यांसाठी स्पीड टायपिंग टेस्ट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पद्धतीने सहभाग घेतला. यावेळी आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. डी. डी. शिंदे यांनी सांगितले, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंटची सुविधा देण्यात येते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच यावेळी प्रमुख अतिथी प्राचार्य आशीष काटे (आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल), प्राचार्य कैलास थोरात (आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल), आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे रजिस्ट्रार गुलाब हिरे, व्यवस्थापक महेश रत्नपारखी आदी मान्यवर उपस्थित होते. यात विभागाचे विभागप्रमुख मेकॅनिकल प्रमुख प्रा. उल्हास पाटील, सिव्हील प्रा. समृद्धी शेलवले, इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन प्रा. सुमित कुमार, प्रा. वैशाली शिंदे यांनी प्रात्यक्षिके सादरीकरणासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व इतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.