विरारमध्ये आधार कार्ड, मतदान नोंदणी शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरारमध्ये आधार कार्ड, मतदान नोंदणी शिबीर
विरारमध्ये आधार कार्ड, मतदान नोंदणी शिबीर

विरारमध्ये आधार कार्ड, मतदान नोंदणी शिबीर

sakal_logo
By

वसई, ता. २९ (बातमीदार) : बहुजन विकास आघाडी झोपडपट्टी सेलच्या वतीने चार दिवस आधार कार्ड व मतदान नोंदणी शिबिराचे आयोजन विरार पूर्व फुलपाडा येथे करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आमदार हितेंद्र ठाकूर व आमदार माजी महापौर राजीव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर आमदार क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. याप्रसंगी माजी नगरसेवक किशोर पाटील, परिवहन समिती सदस्य कल्पक पाटील, निषाद चोरघे, बविआ झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष प्रदीप मिश्रा, वसंत तिवारी, पूजा परब, श्रद्धा देसाई, प्रज्ञा देसाई यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वसई : आधार कार्ड व मतदान शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.