शिक्षकाकडूनच विद्यार्थ्याच्या मनाची जडणघडण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकाकडूनच विद्यार्थ्याच्या मनाची जडणघडण
शिक्षकाकडूनच विद्यार्थ्याच्या मनाची जडणघडण

शिक्षकाकडूनच विद्यार्थ्याच्या मनाची जडणघडण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : जेथे शिक्षकांचा सन्मान होतो, तेथे सर्वात जास्त विकास होतो; परंतु शिक्षकांना अध्यापनापेक्षा वेगळीच कामे दिली जातात. विद्यार्थ्यांमधील कला-गुण शोधण्याची एक वेगळी दृष्टी शिक्षकाकडे असते. विद्यार्थ्यांच्या मनाची जडणघडण शिक्षकच करतात, असे प्रतिपादन साहित्यिक अशोक बागवे यांनी केले. महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता. २७) काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे आयोजित शिक्षक पुरस्कार सोहळ्यामध्ये शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

डीसीपी व्ही. एम. राठोड म्हणाले, ‘‘वर्गांमध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत. तसेच याचा संचालकांना त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक वर्ग खोलीत कॅमेरा बसवा. काही शिक्षक सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिकवण्याचे काम करत असतात. त्यामुळे प्रथमतः स्वतःची काळजी घ्या. स्वतःमध्ये विश्वास असेल, तर समाजामध्ये शिक्षक दुसऱ्याला ज्ञान देण्याचे कार्य करू शकतो. जगात उत्तुंग भरारी घेण्यासाठी शिक्षकांची गरज असते. देशासाठी सुसंस्कृत पिढी घडवण्याचे सर्वात महत्त्वाचे काम शिक्षक करत असतो.’’
क्लासेस संचालकांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र येण्याचा सल्ला उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिला. लवकरच संघटनेच्या वतीने क्लासेस संचालकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कमीत कमी एकसमान शुल्क आणि इतर निर्णय घेण्यासाठी सामान्य सभा बोलवणार असल्याचे अध्यक्ष देशमुख यांनी सांगितले.

चौकट
विविध पुरस्कारांचे वितरण
या वेळी क्लासेस क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना शिक्षकरत्न पुरस्कार, समाजामध्ये माणुसकी जपत विविध पद्धतीने समाजातील सामान्य माणसासाठी कार्य करणाऱ्यांना समाजरत्न पुरस्कार व उद्योग व्यवसायामध्ये इतरांना आदर्श निर्माण करणाऱ्यांना उद्योगरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.