भोंडल्‍यात पारंपरिक गीतांवर महिलांचा फेरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोंडल्‍यात पारंपरिक गीतांवर महिलांचा फेरा
भोंडल्‍यात पारंपरिक गीतांवर महिलांचा फेरा

भोंडल्‍यात पारंपरिक गीतांवर महिलांचा फेरा

sakal_logo
By

नागोठणे, ता. २८ (बातमीदार) : ग्रामपंचायत सभागृहात सकाळ तनिष्का गटातर्फे भोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात होते, त्या दिवसापासून भोंडल्याची सुरुवात होते. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी भोंडला खेळला जातो.
घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो.
एका पाटावर समृद्धीचे प्रतीक असलेल्‍या हत्तीचे चित्र रेखाटून पूजा केली जाते. त्याभोवती फेर धरून मुली भोंडल्याची पारंपरिक गाणी गात फेरा धरतात; तर काही ठिकाणी कुमारिका पाटावर डाळ-तांदळाचा हत्ती रेखाटून त्याभोवती फेर धरून गाणे गात पूजा करतात. तनिष्का महिला संचच्या संध्या जाधव, दीक्षा धामणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात बचतगटातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्‍या होत्‍या.

कृषी संस्कृतीत विशेष महत्त्व
रेखाटलेल्‍या हत्तीच्या चित्रावर लाकडाची मंडपी टांगून निरनिराळ्या फळा-फुलांच्या माळा घालतात. याच भोंडल्याला हादगा, भुलाबाई असेही संबोधले जाते. भोंडला किंवा हादगा याचे कृषी संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. महिलांच्या सुफलीकरणाचा विधी म्हणून याकडे पाहिले जाते.