मुंबई अहमदाबाद महामार्गावर सलग दोन अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई अहमदाबाद महामार्गावर सलग दोन अपघात
मुंबई अहमदाबाद महामार्गावर सलग दोन अपघात

मुंबई अहमदाबाद महामार्गावर सलग दोन अपघात

sakal_logo
By

मनोर, ता. २९ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुरुवारी सकाळी चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दोन अपघात झाले होते. सकवार उड्डाण पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकला धडकून उलटला होता; तर दुसऱ्या अपघातात चारचाकी खाजगी प्रवाशी वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला होता. दोन्ही अपघात सकवार गावच्या हद्दीत झाले असून दोन्ही वाहनांचे चालक किरकोळ जखमी झाले होते.
महामार्गावर सकवार गावच्या हद्दीतील उड्डाण पुलावर गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडकून गुजरात मार्गिकेवर उलटला. यामुळे येथील वाहतूक सेवा रस्त्यावरून सुरू ठेवण्यात आली होती. अपघातात वाहनचालक किरकोळ जखमी झाला; तर दुसरा अपघात महामार्गावर सकवार गावचे हद्दीत दहाच्या सुमारास झाला होता. सुरतवरून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या मॅजिक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकाला धडकून रस्त्याच्या कडेला उलटली होती. अपघातात वाहनचालक गौतम नरेश काकड (२३) किरकोळ जखमी झाला.