राज्य शासनाने जीएसटीमध्ये सवलत द्यावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य शासनाने जीएसटीमध्ये सवलत द्यावी
राज्य शासनाने जीएसटीमध्ये सवलत द्यावी

राज्य शासनाने जीएसटीमध्ये सवलत द्यावी

sakal_logo
By

विरार, ता. २९ (बातमीदार) ः वसईसह राज्याच्या इतर भागातील सहकारी संस्थांना अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यातील एक म्हणजे सहकारी संस्थांकडून विक्री केल्या जाणाऱ्या मालावर राज्य शासनाने लावलेला जीएसटी. हा जीएसटी कमी करावा आणि सहकारी संस्थांना दिलासा द्यावा, या मागणीसह इतर विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी वसईतील सहकारी संस्थांमधून पुढे येत आहे.
सहकारी संस्थांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे; मात्र राज्य शासनाच्या विविध धोरणांमुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी वसई पान मार्केटिंग सहकारी सोसायटीचे चेअरमन रोहन गोन्साल्विस यांनी राज्याचे सहकार मंत्री सावे यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. शेड्युल बँकांना गुंतवणूक करण्याची जी मुभा आहे, त्याप्रमाणे सहकारी संस्थांना गुंतवणूक करण्याची सुविधा असावी. तसेच ज्या सहकारी संस्थांचा निव्वळ नफा ५० कोटींपेक्षा कमी आहे त्यांना आयकरातून सूट मिळावी. यासह सहकारी संस्थांकडून विक्री केल्या जाणाऱ्या मालावर राज्य शासनाने जीएसटी कमी आकारावा जेणेकरून खासगी व्यापाराबरोबर स्पर्धा करता येईल; तर खासगी व्यापारी माल जीएसटी न लावता विकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काळा पैसा निर्माण होतो. त्यामुळे यावर आळा घालता येईल, अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.