हिरो मोटोकॉर्पची जीआयएफटी ऑफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिरो मोटोकॉर्पची जीआयएफटी ऑफर
हिरो मोटोकॉर्पची जीआयएफटी ऑफर

हिरो मोटोकॉर्पची जीआयएफटी ऑफर

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ ः हिरो मोटोकॉर्प या दुचाकी आणि स्कूटर्स उत्पादक कंपनीने आज हिरो जीआयएफटी ग्रॅण्ड इंडियन फेस्टिव्हल ऑफ ट्रस्टच्या लॉन्चिंगची घोषणा केली. या उपक्रमामध्ये आकर्षक मॉडेल रिफ्रेशेस, रिटेल लाभ, प्री बुकिंग ऑफर्स यासह अनेक आर्थिक योजनांचा समावेश आहे.

यंदाच्या मोहिमेची थीम आहे ‘इंडिया, लेट्स सेलिब्रेट, फिर से दिल से’. या मोहिमेबाबत बोलताना हिरो मोटोकॉर्पचे चीफ ग्रोथ ऑफिसर रणजीवजीत सिंग म्हणाले की, हिरो मोटोकॉर्पने १०० दशलक्षहून अधिक ग्राहकांच्या गरजांची पूर्तता केली आहे. आम्ही आशा करतो की, जीआयएफटी ग्राहकांचे मनोबल वाढवेल. ग्राहकांना याचे नवीन फायदे मिळतील. या प्रमोशनचा भाग म्‍हणून कंपनी विमा लाभ, सुलभ आर्थिक योजना देऊ करत आहे. यात बाय नाऊ-पे लेटर, कमी सुरुवातीचा भरणा, कॅश ईएमआय, ५ वर्षांची प्रमाणित वॉरंटी आणि विविध उत्‍पादनांवर रोख लाभ यांचा समावेश आहे. ग्राहक आधार आधारित कर्ज प्रक्रिया सुविधा स्किमसाठी देखील अर्ज करू शकतात.
हिरो स्‍कूटर्स सुपर-६ धमाका पॅकेजसह येतील. ज्‍याअंतर्गत १३, ५०० रुपयांपर्यंतचे लाभ मिळतील. या लाभांमध्‍ये वर्षभर विमा लाभ, २ वर्ष मोफत मेन्‍टेनन्‍स, ३००० रुपयांचा एक्‍स्‍चेंज बोनस, ५००० रुपयांचे गुडलाईफ गिफ्ट वाऊचर्स, ५ वर्ष वॉरंटी आणि ० टक्‍के व्‍याजासह ६ महिने ईएमआय ऑफर्स यांचा समावेश आहे. हिरो मोटोकॉर्पने स्‍टायलिश १२५ सीसी ग्‍लॅमर एक्‍सटेकसाठी ऑफिशियल ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर म्‍हणून सुपरस्‍टार राम चरण यांची निवड केली आहे.