ठाण्यात ‘स्त्री व्यक्तिरेखा... पुलंच्या लेखनातल्या’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात ‘स्त्री व्यक्तिरेखा...  पुलंच्या लेखनातल्या’
ठाण्यात ‘स्त्री व्यक्तिरेखा... पुलंच्या लेखनातल्या’

ठाण्यात ‘स्त्री व्यक्तिरेखा... पुलंच्या लेखनातल्या’

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ ः लोकप्रिय दिवंगत लेखक पु. ल. देशपांडे यांच्या लिखाणातील काही निवडक स्त्री व्यक्तिरेखा गुंफून साकारलेल्या ‘स्त्री व्यक्तिरेखा पुलंच्या लेखनातल्या’ हा कार्यक्रम शुक्रवारी (ता. ३०) संध्याकाळी ५ वाजता राजमाता जिजाबाई ट्रस्ट आणि शारदा सार्वजनिक वाचनालय यांच्यातर्फे जिजामाता हॉल, ठाणे (पूर्व) येथे तसेच शनिवारी (ता. १) संध्याकाळी ६.०० वाजता ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने नौपाडा ठाणे (पश्चिम) येथील त्यांच्या सभागृहात होत आहे. या कार्यक्रमात पुलंच्या व्यक्तिरेखांचे अभिवाचन आणि नाट्यरूप या पद्धतीने सादरीकरण करण्यात येईल. कार्यक्रम साधारण दीड तासाचा असून अमूल पंडित, माधव चिरमुले, अंजली शेवडे, विशाखा देशपांडे, स्मिता नायर, प्रिया ओक हे कलाकार सादर करतील. रसिकांना प्रवेश विनामूल्य आहे.