खंडणी उकळणाऱ्या तोतया पत्रकाराला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडणी उकळणाऱ्या तोतया पत्रकाराला अटक
खंडणी उकळणाऱ्या तोतया पत्रकाराला अटक

खंडणी उकळणाऱ्या तोतया पत्रकाराला अटक

sakal_logo
By

भाईंदर, ता. २९ (बातमीदार) : प्लास्टिक विकत असल्याची तक्रार न करण्याबद्दल दुकानदाराकडे पाच हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारासह चार जणांना भाईंदर पोलिसांनी अटक केली. या तोतया पत्रकाराविरोधात आणखीन दोन गुन्हे दाखल आहेत.
भाईंदर पश्चिम येथील एका दुकानात जाऊन दुकानमालक प्लास्टिक विकत असल्याबद्दल तक्रार करण्याची धमकी पत्रकार असल्याची बतावणी करणाऱ्या धीरज दुबे याने दिली. तक्रार करायची नसेल, तर पाच हजार रुपये दे; अन्यथा सोबत आलेल्या व्यक्ती मारहाण करतील, असेही दुबे याने दुकानदाराला सांगितले. दुकानदाराने भाईंदर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला व धीरज याला साडेचार हजार रुपयांची खंडणी घेताना अटक केली; तर धीरज दुबे याच्यासह एक महिला व दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. धीरज याच्यावर याआधी अमली पदार्थ कायदा तसेच बाललैंगिक अत्याचारविरोधी कायद्यानुसारदेखील गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.