मानखुर्दमध्ये एकावर प्राणघातक हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानखुर्दमध्ये एकावर प्राणघातक हल्ला
मानखुर्दमध्ये एकावर प्राणघातक हल्ला

मानखुर्दमध्ये एकावर प्राणघातक हल्ला

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २९ (बातमीदार) ः मानखुर्दच्या पीएमजीपी वसाहतीत संतोष रजभर (वय ३८) याच्यावर तिघांनी प्राणघातक हल्ला केला. मानखुर्द पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदवला आहे. त्यापैकी दोघे अल्पवयीन असून त्यांना डोंगरी येथील बाल न्यायालयात पाठवण्यात आले, तर अजय दुबे (वय ४०) याला अटक करण्यात आली आहे. पीएमजीपी वसाहतीतील बुद्धविहारालगत गुरुवारी (ता. २९) पहाटे संतोष याच्यावर तिघांनी प्राणघातक हल्ला केला. पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून केलेल्या या हल्ल्यात धारदार शस्त्राने त्याच्या मानेजवळ वार करण्यात आला. त्यात त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली. त्याची बहीण राजयंती सागवेकर हिने दिलेल्या तक्रारीनंतर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदवून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मानखुर्द पोलिस अधिक तपास करत आहेत.