सीएनजी ४० टक्के अनुदानीत दराने मिळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीएनजी ४० टक्के अनुदानीत दराने मिळावा
सीएनजी ४० टक्के अनुदानीत दराने मिळावा

सीएनजी ४० टक्के अनुदानीत दराने मिळावा

sakal_logo
By

सीएनजी ४० टक्के अनुदानित दराने मिळावा
मुंबई आटोरिक्षा टॅक्‍सीमेन्स युनियनची मागणी

मुबंई, ता. २९ ः राज्य सरकारने जाहीर केलेली रिक्षा-टॅक्‍सीची भाडेवाढ तुटपुंजी आहे. कोविड महामारीमुळे रिक्षा-टॅक्‍सीचालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. लाखो रिक्षा-टॅक्‍सीमालक कर्जबाजारी झाले आहेत. सीएनजी गॅसचे दर ६० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने रिक्षा-टॅक्सीसाठी ४० टक्के अनुदानित दरात सीएनजी द्यावा, अशी मागणी मुंबई ऑटोरिक्षा टॅक्‍सीमेन्स युनियनने केली आहे.
सीएनजीच्या दरवाढीमुळे रिक्षा-टॅक्‍सी चालकांचे रोज मोठे आर्थिक नुकसान होत आहे. राज्य सरकारने खटुवा समितीच्या शिफारसी न मानता मनमानी पद्धतीने भाडेवाढ केली आहे, असा आरोप मुंबई युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केला आहे. शिवाय, तुटपुंज्या भाडेवाढीमुळे रिक्षा-टॅक्‍सीचालक-मालकांमध्ये असंतोष असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सीएनजी ४० टक्के अनुदानित दराने रिक्षा-टॅक्‍सीचालक-मालकांना मिळत नाही, तोपर्यंत खटुवा समितीच्या शिफारशीनुसार वाढीव भाडेवाढ तातडीने द्यावी, अशी मागणी राव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.