दूरदर्शनच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त शनिवारी कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दूरदर्शनच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त शनिवारी कार्यक्रम
दूरदर्शनच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त शनिवारी कार्यक्रम

दूरदर्शनच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त शनिवारी कार्यक्रम

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : मुंबई दूरदर्शनला रविवार २ ऑक्टोबर रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघात शनिवारी (ता. १) सायंकाळी ५ वाजता ‘सुवर्णमहोत्सवी मुंबई दूरदर्शन- मंतरलेले दिवस’ हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत हे प्रमुख पाहुणे; तर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे असतील. तसेच मुंबई दूरदर्शनच्या गेल्या ५० वर्षांच्या वाटचालीतील अनेक शिलेदार या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या वेळी डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या ‘स्मृतींची चाळता पाने’ आणि ‘या गावाहून त्या गावाला’ या पुस्तकांचे प्रकाशन संपन्न होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून लोकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण यांनी केले आहे.