मुंबई-जयनगरदरम्यान सहा फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई-जयनगरदरम्यान सहा फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन
मुंबई-जयनगरदरम्यान सहा फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन

मुंबई-जयनगरदरम्यान सहा फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : मध्य रेल्वेने सणानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई आणि जयनगरदरम्यान सहा विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दिवाळी आणि दसऱ्याला गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०५५३० मुंबई- जयनगर विशेष गाडी २८ ऑक्टोबर २०२२ ते ११ नोव्हेंबर २०२२ पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर शुक्रवारी रात्री १२. १५ वाजता सुटेल आणि जयनगर येथे दुसऱ्‍या दिवशी दुपारी ३ वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०५५२९ जयनगर-मुंबई विशेष गाडी २५ ऑक्टोबर २०२२ ते ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत जयनगर येथून दर मंगळवारी रात्री ११.५० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता पोहोचेल. या दोन्ही फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, पटना, बरौनी, समस्तीपूर आणि दरभंगा या स्थानकांवर थांबा असणार आहे. विशेष ट्रेन क्रमांक ०५५३० साठी विशेष शुल्कासह बुकिंग ३० सप्टेंबरला सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.