एलआयसी म्युचुअल फंडाचा मल्टिकॅप फंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एलआयसी म्युचुअल फंडाचा मल्टिकॅप फंड
एलआयसी म्युचुअल फंडाचा मल्टिकॅप फंड

एलआयसी म्युचुअल फंडाचा मल्टिकॅप फंड

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ ः एलआयसी म्युच्युअल फंडाने मल्टिकॅप हा ओपन एंडेड फंड बाजारात आणला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व प्रकारच्या व सर्व श्रेणीतील शेअरमध्ये त्याची गुंतवणूक राहील. याचा एनएफओ ६ ऑक्टोबर रोजी खुला होत असून तो २० ऑक्टोबरला बंद होईल. त्यानंतर तो २ नोव्हेंबरपासून पुन्हा गुंतवणुकीसाठी खुला राहील.

या फंडातील निधी मोठे शेअर, मध्यम आकाराचे शेअर व लहान आकाराचे शेअर यात प्रत्येकी २५ टक्के याप्रमाणे गुंतवला जाईल. उरलेला २५ टक्के निधी फंड मॅनेजरतर्फे त्यांच्या निर्णयक्षमतेनुसार बाजाराचा अभ्यास करून सर्व प्रकारच्या शेअरमध्ये गुंतवला जाईल, असे एमडी व सीईओ टी. एस. रामकृष्णन म्हणाले. या योजनेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अंतर्गत मॅक्रो बेस्ड व्हॅल्युएशन चेक हे आहे. यानुसार फंड मॅनेजरतर्फे शेअर्समधील गुंतवणूक जोखीम, व्याजदर, कंपन्यांच्या मिळकतीमधील वाढ आदी बाबी लक्षात घेऊन तसेच बाजारातील बदल आणि घडामोडींच्या अनुषंगाने समभागांमधील निधीचे वाटप केले जाईल. मल्टिकॅप फंडात गुंतवणूक केल्यामुळे बाजारांमधील वाढीच्या संधी गुंतवणूकदारांना मिळतीलच, पण शेअर किमतीच्या ओव्हर व्हॅल्युएशनच्या सापळ्यातही गुंतवणूकदार अडकणार नाहीत, अशी माहिती सीआयओ योगेश पाटील यांनी दिली. मल्टिकॅप फंडाचे फंड मॅनेजर योगेश पाटील आहेत.