पालघरमध्ये निवडणूक मतदान प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरमध्ये निवडणूक मतदान प्रशिक्षण
पालघरमध्ये निवडणूक मतदान प्रशिक्षण

पालघरमध्ये निवडणूक मतदान प्रशिक्षण

sakal_logo
By

पालघर, ता. २९ (बातमीदार) ः पालघर तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण गुरुवारी (ता. २९) पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडले.
ग्रामपंचायतींसाठी नेमणूक करण्यात आलेल्या केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व शिपाई यांना या प्रशिक्षण वर्गामध्ये पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांनी मार्गदर्शन केले. राज्य निवडणूक विभागाने केलेल्या बदलांबद्दल सविस्तर माहिती देताना प्रत्येक मतदान अधिकारी आणि सहकारी यांना त्यांचे कर्तव्य काय हे सविस्तर सांगितले. चार ऑक्टोबरला होणारे प्रशिक्षण १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. १६ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गिरीश माळी यांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणासाठी तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी होते.
या वेळी पालघरचे प्रांत अधिकारी धनाजी तोरस्कर, सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, निवासी नायब तहसीलदार केशव तरंगे, डी. जी. गडग आदी मान्यवर उपस्थित होते.