नवरात्रोत्सवात आदिशक्ती नवदुर्गांचा सन्मान सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्रोत्सवात आदिशक्ती नवदुर्गांचा सन्मान सोहळा
नवरात्रोत्सवात आदिशक्ती नवदुर्गांचा सन्मान सोहळा

नवरात्रोत्सवात आदिशक्ती नवदुर्गांचा सन्मान सोहळा

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. २९ (बातमीदार) : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत स्वकर्तृत्वाने विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे, अशा नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ व शिवशाहू प्रतिष्ठानच्या वतीने बाळ दंडवते स्मृती सभागृह, ना. म. जोशी मार्ग, बावला मशीदच्या समोर, करीरोड (पश्चिम) येथे हा सोहळा संपन्न झाला. कोविड काळात अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कार्य केलेल्या परिचारिका ते मुंबई शहराच्या महापौर म्हणून सर्वांना परिचित असलेल्या किशोरी पेडणेकर, त्याचबरोबर मल्लखांबसारख्या खेळात अतिशय कमी वयात राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मानित असणाऱ्या हिमानी परब, तसेच कोविड काळात कोविडग्रस्त असलेल्या १३०० मातांच्या प्रसूती, त्याचबरोबर २० हजार कोविड रुग्ण हाताळणाऱ्या व त्यांना कोविड सेंटरच्या माध्यमातून उपचार देणाऱ्या नायर हॉस्पिटलच्या असिस्टंट डीन म्हणून काम पाहणाऱ्या डॉ. सारिका पाटील यांचा सन्मान करण्यात आला. तसेच डॉ. स्मिता दातार, समुपदेशनाचे काम पाहणाऱ्या आरती बनसोडे, कोविड काळात घरोघरी जाऊन रक्त तपासणी मोहीम राबवणाऱ्या व विभागात मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देणाऱ्या समाजसेविका अबोली खाड्ये, योगा प्रशिक्षिका प्रज्ञा पवार, यशस्वी उद्योजिका पूनम भोसले, मीना कांदळकर, वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय नेटाने सांभाळणाऱ्या रूपाली पवार, अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यासाठी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त विजय रावराणे, कार्याध्यक्ष मधुसूदन सदडेकर, विश्वस्त संजय चौकेकर, जीवन भोसले व शिवशाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र देसाई, कार्याध्यक्ष राजू येरुडकर, सचिव कृष्णा पाटील, लोकशांती सोसायटीचे अध्यक्ष विलास पाटील, तिरुपती सोसायटीचे अध्यक्ष नीलेश मानकर यांच्यासह पदाधिकारी, सदस्य व विभागातील महिला उपस्थित होते.