आजपासून ‘वंदे भारत’ धावणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजपासून ‘वंदे भारत’ धावणार!
आजपासून ‘वंदे भारत’ धावणार!

आजपासून ‘वंदे भारत’ धावणार!

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : पश्चिम रेल्वे मार्गावर शुक्रवारपासून (ता. ३०) मुंबई ते अहमदाबाददरम्यान वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस धावणार आहे. या पहिला ट्रेनचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या ट्रेनची नियमित सेवा १ ऑक्टोबर २०२२ पासून मुंबई सेंट्रल येथून सुरू होणार आहे.
बहुप्रतीक्षित आणि नव्याने बनवलेली सेमी-हाय स्पीड ट्रेन अर्थात वंदे भारत एक्स्प्रेस आता धावण्यासाठी सज्ज आहे. नुकतीच रेल्वे मंत्रालयाने मुंबई ते अहमदाबाददरम्यान वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस चालवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मुंबई सेंट्रल ते गांधीनगरदरम्यान रविवार सोडून दररोज ती धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता गांधीनगर येथून वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनच्या पहिल्या फेरीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.