परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयातही हेरिटेज वॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयातही हेरिटेज वॉक
परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयातही हेरिटेज वॉक

परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयातही हेरिटेज वॉक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३० : जे. जे. रुग्णालयानंतर आता लवकरच परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयातही हेरिटेज वॉक सुरू होणार आहे. या वॉकच्या निमित्ताने, रुग्णालयाचा शंभरहून अधिक वर्षांचा इतिहास प्राणिप्रेमींसाठी उलगडणार आहे. हेरिटेज वॉक एका महिन्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे.

राज्य सरकारचा पर्यटन विभाग आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत महाविद्यालय महाराष्ट्र टूर गाईड अँड टुरिस्ट फॅसिलिटेटर असोसिएशनच्या मार्गदर्शकांना पुढील दोन आठवड्यांत कॅम्पसमधील विविध वास्तूंच्या ऐतिहासिक पैलूंबाबत प्रशिक्षण देईल. राज्याच्या पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावलकर हे देखील या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. महाविद्यालयाच्या आवारातील शंभर वर्षांहून अधिक जुन्या असणाऱ्या तीन इमारती हे या हेरिटेज वॉकचे प्रमुख आकर्षण ठरणार असल्याचे आहे. सध्याची प्रशासकीय इमारत, जुने वसतिगृह आणि महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभाग हे संग्रहालयातील आकर्षण असेल. संग्रहालयात हत्ती, घोडा आणि हरणांचे सांगाडे, तसेच अनेक प्राण्यांचे जतन केलेले नमुने असल्याने ते विशेषतः प्राणिप्रेमींसाठी मनोरंजक असेल, असे सांगण्यात आले.

महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेचे माजी सचिव डॉ. जी. एस. खांडेकर म्हणाले की, खेडेगावातील मुलगा असल्याने १९८६ मध्ये पहिल्यांदा मुंबईत आलो; तेव्हा गोंधळलेले, मोठे शहर भीतिदायक वाटले होते. महाविद्यालयाच्या कॅम्पसने त्यांच्यासह इतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात महत्त्वाचे योगदान दिले.